जागतिक मराठी दिन तथा वि .वा. शिरवाडकरांचा जन्मदिन उत्साहात साजरा

मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक मराठी दिनाचा जागर तसेच मराठी साहित्यातले मापदंड असलेले तात्यासाहेब तथा वि .वा. शिरवाडकरांचा जन्मदिन उत्साहात साजरा……

मविप्र संस्थेच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी जागतिक मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कवी तसेच स्थापत्य अभियंते श्री किशोर पाठक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास होळकर यांच्या हस्ते श्री किशोर पाठक यांचा सत्कार करण्यात आला. श्री. पाठक यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रा बरोबरच आपली मराठी भाषा तसेच आपले मराठी साहित्य वाचण्याचा छंद जोपासण्याचे आवाहन केले.  अतिशय खुमासदार शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास होळकर सरांनी आपल्या भाषणात महाविद्यालयात अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी देत असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर मराठी भाषेची महतीही त्यांनी विषद केली. यावेळी या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विविध विभागाचे विभागप्रमुख , शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतिश सूर्यवंशी ( यांत्रिकी विभाग) यांनी केले.